मेसेज आला म्हणून मोबाईलकडे लक्ष गेलं, पण रात्रीचे साडे बारा वाजले होते. एवढ्या रात्री कोण मेसेज करणार होतं? बायकोला सांगूनच मित्राबरोबर 'बसलो' होतो म्हणजे तिचा नक्कीच नसणार. शुक्रवारची रात्र सेलेब्रेट करायचा प्लॅन खूप दिवस सुरू होता. उत्सुकतेने घाई घाईत मोबाईल हातात घेतला तर नंबर होता जो मी सेव्ह नव्हता केला.
"श्री, खूप आठवण येतेय तुझी. मला मदत हवीय." असा होता मेसेज. व्हाट्सएप वरचा फोटो दिसत होता आणि ओळखीचा सुध्दा होता. सोनल मराठे, बँक कॉलोनीतील मैत्रीण. इमर्जन्सी असेल असं वाटल्याने लगेच फोन केला तर पलीकडून फोन कट केला.
"थँक्स तू मला ओळखलस, पण बोलू शकत नाही. मेसेजच पाठव." -सोनल
"काय झालं? कसली मदत हवीय?" - मी
"मानसिक मदत! तुझा सहवास हवाय" - सोनल
"सोनल, तुझंही लग्न झालंय आणि माझंही. मला ह्या सर्व गोष्टींत रस नाहीये. मागेही मी तुला बोललोय हे. मला पुन्हा कॉन्टॅक्ट करू नकोस." - मी
"मला हवा आहेस तू.. श्री. प्लिज..एकदा मला भेटायला ये आणि मला हवंय ते भरभरून दे प्लिज प्लिज" सोनल च्या मेसेज मध्ये आगतिकता दिसून येत होती.
"काय?? ठीक आहेस ना तू? गो टू हेल" मेसेज करून मी मोबाईल बाजूला फेकला. माझी बिअरची थोडीफार चढलेली नशाच उतरली.
अस्वस्थ झालेल्या मला पाहून दीपक ने विचारलं काय झालं, आणि झपझप वीस वर्षांपूर्वीचे दिवस डोळ्यासमोर आले.
दहावीच वर्ष संपलं तसं बाबांची बदली झाली म्हणून आम्ही मुंबईत आलो. बँक कॉलोनी छान होती पटकन छानसा ग्रुप तयार झाला. नवीन जागी मन रमू लागलं.
सोनल मराठे, माझ्याच बिल्डिंगमध्ये तळ मजल्यावर राहत होती. सोनल तीन बहिणींमध्ये सर्वात मोठी, एकदम डॅशिंग, नेहमीच मुलांच्या ग्रुप मध्ये रमणारी. गोरीपान, नाकी डोळी छान, दाट काळेभोर केस, कोणीही सहज भाळेल, असं व्यक्तिमत्त्व. पण तिचा स्वभाव एकदम रोखठोक त्यामुळे तिच्या वाटेला सहसा कोणी जात नसे. सर्व मुलं तिला दबकूनच असतं. दोन्ही लहान बहिणींच्या संरक्षणाची जबाबदारी तिने स्वखुशीने घेतली होती आणि नेटाने पारही पाडत होती. ग्रुप मध्ये मात्र मन मोकळं करून बोलत चालत असे.
सुरवातीला साफ मनाची वाटणारी सोनल आतून इतकी विक्षिप्त असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
सन २००३ ची रंगपंचमी होती, दोन तीन वर्षांत चांगलीच मैत्री झाली होती बँक कॉलोनीतील गँगशी. आम्ही दुपारी दोन वाजेपर्यंत रंग खेळत होतो, खूप धमाल केली. भूक लागली म्हणून घरी जायला निघालो तर सोनल ने तिच्या घरी बोलावलं.
"श्री, घरी चल ना थोडावेळ बस मग जा" - सोनल
"अगं नको, भूक लागलीय मला" - मी
"ये ना रे घरी, मी तुझी भूक शमवेन" मला हाताने धरून आत खेचत सोनल मिश्किलपणे हसत बोलली. तिच्या अश्या आगाऊपणाचा मला रागच आला, पण नाइलाजाने मला आत जावं लागलं. तिच्या बहिणी अजून घरी आल्या नव्हत्या, आई बाबा पण नव्हते घरी.
"सोनल, कोणीच कसं नाहीये घरी? चल, संध्याकाळी येतो मी" अनामिक भीती माझ्या मनात तरळली.
"कोणी नाहीये तर अजूनच बरं आहे ना" सोनल दरवाजा बंद करत माझ्याजवळ येत बोलली.
"मला खूप भूक लागलीय आणि आई मला बोलावत असेल. मी निघतो" मी तिथून निसटण्याचा प्रयत्न करत होतो.
"थांब रे, इतक्या दिवसांनी संधी मिळालीय ही. अशी वाया जाऊ देणार नाही मी" आताशा सोनल माझ्या खूपच जवळ आली होती.
मी भिंतीला टेकलो होतो आणि ती इतक्या जवळ आली होती की तिचे जड श्वास मला जाणवत होते, आज तिला मी वेगळयाच रूपात बघत होतो.
"सकाळ पासून तुला रंग लावण्याची संधी शोधत होते आता तुही मला मनसोक्त रंग लाव, एकमेकांच्या रंगात भिजून जाऊयात आज" - एवढं बोलून तिने तिचे ओठ माझ्या ओठांवर ठेवून हलकासा चावा पण घेतला.
तिच्या अनपेक्षित अश्या वागण्याने मी गडबडलो आणि तिला बाजूला ढकलून घाईघाईने दरवाजा उघडून निघून गेलो. मला तर धक्काच बसला होता, सोनल कडून अशी अपेक्षा नव्हती. इतकी बेधडक आणि निर्धास्त चाल केली होती तिने, मी स्वप्नात सुद्दा असा विचार नव्हता केला. ग्रुप बाहेर तिचं माझं बोलणंही खास नव्हतं किंवा तिच्या मनात असं काही सुरू असेल याची पुसटशी शंकाही कधी आली नव्हती.
त्या दिवसानंतर मी सोनलला टाळू लागलो. ग्रुप मध्ये असतानाही मी तिच्याशी बोलत नव्हतो. तिच्या नजरेत साधी अपराधीपणाच्या भावनेची झाकही नव्हती. नक्कीच चारित्रहीन असणार ती असा मी अंदाज बांधून तिच्यापासून दूर राहू लागलो.
"श्री, एकदा ऐकून तरी घे माझं. मला बोलायचं आहे तुझ्याशी." जाता येता मला रस्त्यात अडवून मनधरणी करू लागली. पण माझ्या नजरेत ती पडली होती. अश्या मुलींपासून दूरच राहावं हेच शिकलो होतं लहानपणापासून.
मित्रांकडून नकळतपणे तिच्याबद्दल अजून माहिती काढू लागलो.
"श्री, तू आंधळा आहेस की बहिरा रे? की मूकबधिर आहेस?" सोनल बद्दल सागर ला विचारताच तो बोलला.
"म्हणजे?" मी न समजून त्याला विचारलं.
"अरे सोनलवर अर्धी कॉलनी मरतेय, पण तिच्या बेधडक अश्या वागण्याने सर्व तिला दबकून असतात. मागे 'इ' विंग मधल्या एकाने हिम्मत केली होती आणि तिला पत्र दिलं होतं, सोनल ने त्याला भर रस्त्यात कानाखाली वाजवली होती. अशी दुर्गा चंडिका स्वतःहून तुला भाव देते, मी तर म्हणतो लाइन मारतेय तुझ्यावर. आणि तू?? आंधळा झालंयस?" सागर ने सविस्तर माहिती दिली.
"सागर, ह्याला कदाचित मुलं आवडत असतील." रोहीतने डोळा मारून सागरला टाळी दिली आणि दोघे खो खो हसू लागले.
"असं नाही रे, सोनल छानच आहे. पण तिचं व्यक्तिमत्त्व असं आहे की मी त्या दृष्टीने कधी विचारच नाही केला". मी माझी बाजू स्पष्ट केली.
म्हणजे सोनलचा असा काही इतिहास नव्हता. तिला चारित्रहीन समजणं माझी चुकी होती. पण तिचं माझ्यावर प्रेम असलं तरी व्यक्त करण्याची ही कोणती पद्धत??
"श्री, आज तुला माझं ऐकावंच लागेल. प्लिज. का बोलत नाहीयेस ते तरी सांग." सोनलने कट्ट्यावर सगळ्यांसमोर मला विचारलं.
तिने सरळसरळ केलेल्या हल्ल्याने मीच खजील झालो. माझी काहीच चुकी नसताना मला अपराधी वाटू लागलं. बाजूला जाऊन बोलूया एवढंच मी बोलू शकलो तिथे गँग मध्ये. आता सागर आणि रोहितला काय सांगायचं हा देखील प्रश्न पडला होता.
"प्लिज समजून घे मला श्री. तुला नाही आवडलं, मी आता पुन्हा असं नाही वागणार. मला तू आवडतोस, व्यक्त करण्याची माझी पद्धत चुकली असेल. याची शिक्षा मला देऊ नकोस. पुन्हा आपण मित्र होऊयात?" तिच्या वारंवार अश्या विनवणीने मी पण माझा हेका सोडला आणि पुन्हा तिच्याशी बोलू लागलो.
मागचं सर्व विसरून पुन्हा आम्ही मित्र झालो, वर्ष सहा महिने निघून गेले असतील. माझी एक्साम संपली होती आणि तिचा नवीन जॉब सुरू झाला होता.
"श्री, माझ्या ऑफिसची पिकनिक आहे शनिवारी- रविवारी, लोणावळ्याला. तुला यावंच लागेल कारण तू आलास तरच मला घरून परवानगी मिळेल." सोनलला ऑफिस पिकनिकला जायचंच होतं.
"अगं पण मी काय करणार तुमच्या ग्रुप मध्ये, माझ्या ओळखीचं कोणीच नाही तिथे." मी प्रॅक्टिकल प्रश्न विचारला.
"मी आहे ना? अजून तुला कोण हवंय? आय प्रॉमिस मेमोरबल पिकनिक होईल ही." मी हो म्हणावं म्हणून सोनल प्रयत्न करत होती.
मलाही एक्सायटिंग वाटत होतं खरं म्हणजे ओव्हर नाइट पिकनिक वैगेरे, आणि आताशा आमची केमिस्ट्रीही छान जमू लागली होती. मग जास्त आढेवेढे न घेता मी तयार झालो.
पिकनिकचा दिवस उजाडला. औपचारिक ओळख झाल्यावर आम्ही सुमोत बसलो, थोडी दाटीवाटीच होती. दिवसभर भटकंतीला फार मजा आली. सगळे मिळून ९ जण होतो आम्ही आणि त्यात एक कपल.
रात्री बोनफायर वैगेरे छान कार्यक्रम होता, बिअर ची पण सोय होती. खूप एन्जॉय केला आम्ही, पण जशीजशी रात्र चढू लागली तसे लहान लहान ग्रुप होऊ लागले. सोनल माझ्याबरोबरच होती पण तिला तिच्या बाकी कलीग बरोबर वेळ मिळावा म्हणून मी झोपायला निघालो. तीन रूम्स होत्या त्या बंगल्यात, एका रुम मध्ये जाऊन मी झोपलो.
पूर्ण ग्रुप मध्ये सोनलच फार सुंदर आणि आकर्षक दिसत होती. आज पण ती किती मोहक वाटत होती गुलाबी कुर्ता आणि ब्लु जीन्स मध्ये. आज दिवसभर झालेल्या चोरट्या स्पर्शान्नी मन प्रफुल्लित झालं होतं. तिच्या वागण्यातही नेहमीपेक्षा बराच मोकळेपणा होता. बिअर, लोणावळा की सोनल चा सहवास माहीत नाही पण सोनल मला आज खूपच आकर्षित करत होती, तिचाच विचार करत होतो आणि इतक्यात दरवाज्याचा आवाज आला, मी झोपेचं सोंग घेतलं पण परफ्युमच्या सुवासाने मी ओळखलं की सोनल च आलीये.
सोनल येऊन माझ्या बाजूला बेड वर झोपली, तसं माझ्या छातीत जोरजोरात धडधडू लागलं. मनात असंख्य विचारांचं काहूर माजलं.
'का बरं ही आली असेल इथे , मुलींची तर वेगळी रुम असणार?'
'माझ्या साठीच आली असेल का?'
'ह्या वेळी तिने काही आगळीक केली तर ??'
'खरं म्हणजे मीच ही संधी सोडू नये' आता बिअर खरच धुमाकूळ घालू लागली माझ्या मनात. माझ्या पुरूषसुलभ भावना आकांत करू लागल्या. आज नक्कीच अघटित असं काही तरी होणार होतं.
आणि इतक्यात सोनलचा नाजूक हात माझ्या अंगावर आला, मी झोपेचं सोंग तसंच सुरू ठेवलं.
"श्री झोपलास का?" सोनल चा मादक आवाज.
"हम्म" मी
"बावळट आहेस काय? झोपायला आला आहेस इथे?"
माझा पुरुषी अहंकार दुखावताच मी पटकन वळून हल्लाबोल केला. जे घडू नये ते त्या रात्री घडलं. एकदा नाही अनेकदा. मर्यादेच्या सर्व सीमा ओलांडल्या आम्ही. प्रणयाने धुंद धुंद झालो होतो. कित्येकदा तृप्त होऊन पण पुन्हा अतृप्त होत होतो..
क्रमशः
-शरद नारायण यादव
No comments:
Post a Comment