Tuesday, 1 December 2020

आकर्षण (भाग सहा)

 

          "ओहोs श्रीकांत अंकल, हग्स आणि किसेस. कोण होती ती? गर्लफ्रेंड की काय?" प्रणाली मला चिडवत होती. मी शिताफीने विषय बदलला पण मीराने दिलेलं डिनरचं आमंत्रण स्वीकारावं असा तिने आग्रह धरला.

मीराला मी संध्याकाळी आठ वाजता भेटुया असा मेसेज पाठवला. गोव्याला आल्यापासून वेंधळ्यासारखाच फिरत होतो. मीराला भेटायचं म्हणून छान तयार झालो. खूप दिवसांनी मीराला भेटणार होतो. तब्बल दीड वर्षांनी.

पावणेआठ वाजताच मी ठरलेल्या रेस्टारंट मध्ये येऊन बसलो. खूप आतुरतेने मी मीराची वाट बघत होतो. बरोबर आठ वाजता मीरा आली. आधी पेक्षाही खूप आकर्षक दिसत होती ती आज. 

"बस कर श्री. किती टक लावून बघशील ते पण एका लग्न झालेल्या मुलीला." येताच तिने माझी मस्करी करायला सुरवात केली होती. पण तिचं लग्न झालंय हे लक्षात आल्याने माझा हुरूप अर्धा झाला.

"का रे काय झालं? तोंड का पडलं तुझं ?" माझ्या चेहऱ्यावरील भाव वाचून तिने विचारलं.

"अगं विसरूनच गेलो होतो तुझं लग्न झालंय ते. आता पहिल्या सारखं नाही राहिलं ना? " मी मनातली खंत बोलून दाखवली.

"आता रडू नकोस. आलेय ना मी तुला भेटायला. तेव्हा आत्ताच्या क्षणात जग. मागचं सगळं विसरून जा." मग मीरा अन मी जुन्या आठवणीत रमलो. जेवून झाल्यावर पबला जावं असा प्लॅन झाला. हॉटेल पासून पाच सहा किलोमीटरवर फेमस पब होता. आम्ही दोघेही मीराच्या गाडीने तिथे गेलो. वेळेचं तर भानच नव्हतं.

वेळ खूप मजेत जात होता. प्रणालीने दिलेलं ग्रास ही होतं माझ्याकडेच. रात्री एक वाजता मी अन मीरा पबच्या बाहेर बीच वर बसून गप्पा मारत होतो. रात्रीचा गोवाही खूप सुंदर होता. समुद्राची थंड हवा, नारळाच्या झाडांच्या पानांची हळुवार होणारी सळसळ आणि शुभ्र चांदण्या असलेलं निरभ्र आकाश. गप्पा रंगात आल्या असतानाच बोलता बोलता अचानक ती शांत झाली.

मग माझा हात हातात घेऊन ती बोलली.
"तुला माहितेय श्री? तुझ्या इतकं मला समजून घेणारं कोणीही नाहीये. न बोलताही तू खूप गोष्टी समजून घेतोस. कमी वेळेत आपला प्रोजेक्ट यशस्वी होण्याचं हे देखील एक कारण होतं. त्यावेळी मी ह्या गोष्टींना कमी लेखत होते. पण त्याची किंमत मला खूप नंतर कळाली आणि ते समजण्यासाठी मला खूप किंमतही मोजावी लागली."

"मला नेहमी वाटायचं की विचारांत तू माझी कार्बन कॉपी आहेस, आणि खरंही आहे ते. आता मला तुला सोडावं वाटत नाहीये. पण मला माहितेय की हे आता शक्य नाहीये."

प्रत्येक शब्दागणिक तिचा आवाज जड होत होता.  क्षणभर थांबून माझ्या डोळ्यात पहात ती बोलली "नेनु निन्नू प्रेमीस्तूनानु."

"हॅलो, तेलुगू मध्ये का शिव्या देतेयस?" मी खट्याळ पणे तिला विचारलं. तिने गालात हसून मला टपली मारली. पण हे करताना तिने हळूच तिच्या पाणावलेल्या डोळ्याच्या कडा पुसून घेतल्या.

माझ्या डोक्यात मात्र कधी पासून प्रणालीचं वाक्य फिरत होतं. 'गोव्यात निषिद्ध असं काही नाही, आणि जे गोव्यात घडतं ते गोव्यातच राहतं.'

मग मी सर्वकाही विसरून ह्या क्षणात जगायचं ठरवलं. मीराला घेऊन खरंतर माझ्या हॉटेलवर यायचं होतं पण तिथे प्रणाली काय करत असेल ह्याची कल्पनाही करवत नव्हती. मग आम्ही मीराच्या कार मध्ये मागच्या सीटवर बसलो पुन्हा एकदा युरोपच्या आठवणी जगण्यासाठी.

कारचा दरवाजा बंद होताच आधाशीपणे माझे ओठ तिच्या ओठांशी खेळू लागले. खूप वेळ हे असंच सुरू होतं. तिचे ओठही माघार घ्यायला तयार नव्हते. बाजूला बसलेली मीरा आता माझ्या मांडीवर येऊन बसली. ओठांपासून विलग होत तिने माझा टी शर्ट काढला. आणि माझ्या उघड्या अंगाचा स्पर्श होताच आधी पेक्षा जास्त आवेशाने तिने माझा ताबा घेतला.

मग तिने स्वतःहून तिचा टी शर्ट काढला. आता मी देखील पूर्ण जोशात आलो होतो. पटकन एक हात तिच्या पाठीकडे नेऊन ब्रा काढण्याची खटपट करू लागलो.

"मूर्ख!!अजूनही एका हाताने तुला माझा ब्रा काढता येत नाही. सगळी ट्रेनिंग वाया गेली म्हणायची." मीरा पुन्हा बॉसिंगच्या मूड मध्ये येत बोलली.

"थांब जरा." माझा प्रयत्न न थांबवत मी बोललो. "जाडी झालीयेस तू आधी पेक्षा म्हणून जमत नाहीये एका हाताने." आणि खरंच ती जाडी झालीय हे माझ्या प्रयत्नांना यश मिळताच मला कळलं.

कारच्या दोन्ही काचांवर आता चांगलंच बाष्प जमलं होतं. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि कारच्या सीटची कुरकुर हे दोनच आवाज स्पष्ट ऐकू येत होते आता. खूप वेळानंतर आम्ही दोघे तृप्त झालो. डिसेंबरच्या थंडीत मला चांगलाच घाम फुटला होता आणि त्या छोट्या जागेत खूपवेळ अवघडल्या स्थितीत बसल्याने पायात पेटके आले होते.

पण आज मला नेहमीची मीरा वाटली नाही. तिच्या मनात खूप काही उलाढाली होत होत्या आणि त्याचं प्रतिबिंब प्रणयातील तिच्या प्रतिसादावर उमटलं होतं.

ती मला माझ्या हॉटेलवर सोडून गेली. रूमवर येता येता पहाटेचे पाच वाजले होते. प्रणाली सोफ्यावर झोपली होती आणि बेड मोकळाच होता. मी बेडवर जाऊन अंग टाकलं. खूप थकल्याने दोन मिनिटातच मला गाढ झोप लागली.

"श्री उठ. अरे अकरा वाजलेत. कुठे होतास रात्रभर." कानावर आवाज पडला. क्षणभर मला वाटलं मी मुंबईतच आहे आणि आई बोलतीय, पण प्रणाली मला उठवत होती.

"अंकल, मजा चाललीय तुझी तर. रात्री जेवून येशील असं वाटलं होतं, पण तू तर सकाळीच उगवलास. साडे तीन पर्यंत तुझी वाट बघत होते. फोन पण बंद करून ठेवला होतास. अरे साधा मेसेज करून कळवायचं तरी होतंस." प्रणालीचा माझ्याबद्दल काळजी वजा राग दिसून येत होता. खरंच बायको मटेरिअल आहे ही.

पण मग कालचा मीरा बरोबरचा सहवास आठवून पुन्हा मन उदास झालं. ती बिचारी काहीतरी भावुक होऊन बोलू पहात होती. काहीतरी खूप महत्त्वाचं बोलायचं होतं तिला असं तिच्या डोळ्यात दिसत होतं. आणि मला आपलं 'जीवाचा गोवा' करायचा होता. थोड्या वेळासाठी मला स्वतःचाच खूप राग आला. पण मीराशी जवळीक करण्यासाठी हा देखील एक मार्ग होता अशी मी स्वतःची समजूत काढली.

"काय झालं अंकल, मीरा नाही बोलली का तुला?" माझा उतरलेला चेहरा पाहून प्रणाली माझी मस्करी करू लागली. पण मी तो विषय तिथेच टाळून तिच्या बद्दल बोलू लागलो आणि मग फ्रेश होऊन आम्ही सरळ जेवायला गेलो.

मीराच्या मनात काय चाललंय हे नेमकं मला कळत नव्हतं. खूप प्रश्न निर्माण झाले होते कालच्या तिच्या एकंदर वागण्याने. पुन्हा तेलगू भाषेत ती काहीतरी बोलून गेली होती. कसा थांगपत्ता लागणार तिच्या अशा वागण्याचा? मला तर काही सुचतचं नव्हतं. प्रणालीशी बोलावं असं वाटलं. असंही ती मला जज करणार नव्हती. आणि जरी केलं तरी मला फरक पडणार नव्हता.

खूप वेळ मी माझ्याच विचारांत गुंतलो होतो. जेवून आम्ही पुन्हा रूम वर आलो.

"आता तरी सांगशील का काय झालंय ते? मुलींपेक्षा जास्त मस्का मारावा लागतोय हं तुला आता." -प्रणाली

मग मात्र मी प्रणालीला अगदी सुरवाती पासून सर्व काही सविस्तर सांगू लागलो. बेडवर झोपून आम्ही बोलत होतो. मीरा बद्दल बोलताना मी कधी भावनाविवश झालो हे कळलंच नाही. माझ्या दोन्ही गालांवर ओघळ आले होते आणि आवाज जड झाला होता. माझं हे असं रूप बघून प्रणालीने मला कुशीत घेतलं.

"खुशाल रड आणि मोकळा हो आज श्री." प्रणाली मला कुरवाळत होती.

आणि मी पण लहान मूलसंसारखा तिला बिलगून मुसमुसत होतो. तिच्याशी बोलून तात्पर्य काही निघालं नव्हतं. पण खूप हलकं हलकं वाटत होतं आता.

क्रमशः

-शरद नारायण यादव


आकर्षण (भाग पाच)

 

          असेच दिवस जात होते, माझं वधुसंशोधन जोरदार सुरू होतं. खरंतर मला प्रेमविवाह करायचा होता, पण मीरा प्रकरणात माझे हात चांगलेच भाजले होते. आणि अजूनही त्याची धग अधून मधून लागत होती. प्रत्येक वेळी नकार ऐकूनही ती वारंवार फोन, मेसेजेस करून मला भुरळ घालू पहात होती.

दर रविवारी मी आई बाबांना घेवून मुलींच्या घरचे उंबरठे झिजवत होतो. मनासारखी मुलगी मिळत नव्हती पण कांदेपोह्यांचा मी चांगलाच विश्लेषक झालो होतो. अश्यातही एखादी मनासारखी मुलगी मिळेल आणि प्रेम पण होईल आणि मग आपण अरेंज्ड प्रेमविवाह करू अशी स्वप्नं मी पहात होतो.

प्रत्येक रविवारी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आता माझ्या बरोबर घरच्यांनाही जड जाऊ लागला. आईचं आपलं शनी वक्री आहे, मंगळ जड आहे, सोमवारी गाईला चारा घाल, शनिवारी म्हैशीच शेण काढ असे सगळे उपाय पण सुरू होतं. काहीही करून तिशीच्या आत माझे दोनाचे चार हात करायचे असा चंगच तिने बांधला होता. आणि बाबा येईल त्या स्थळाला 'हो' म्हणत होते. एकदा तर बाबांच्या वयाची दिसेल अशी मुलगी सांगून आली होती तिला ही बाबांनी माझ्यासाठी 'गो अहेड' दिला होता.

इथून पुढे आपणच मुलगी आधी बघायची, पहिल्या फेरीत मुलगी आवडली तरंच आई बाबांना दाखवायचं असं मी ठरवलं होतं. म्हणून मग पारंपरिक विवाहनोंदणी सोडून मी  'लग्न डॉट कॉम' वर नाव नोंदवलं.

रोज ऑफिस सुटल्यावर त्या संकेतस्थळावर मुली बघून संपर्क करत असे. खूप मुली पण संपर्क करत असत. मला जे प्रोफाइल आवडतील त्यांना मी भेटत असे.

एके दिवशी प्रणाली नावाच्या मुलीचा इमेल आला. मला प्रोफाइल आवडला. साधासा फोटो लावला होता. एकंदर सरळ आणि साधी मुलगी वाटली. मीराच्या अनुभवामुळे मला आता साधी मुलगीच हवी होती.

सुरवातीच्या बोलण्या आणि मेसेजेस नंतर मी प्रणालीला भेटण्यास खूपच उत्सुक होतो.

भेटण्याचा दिवस उजाडला, ठरल्याप्रमाणे सहा वाजता मी मॉलमध्ये आलो. फिकट गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, केसांची साधी पण नीटनेटकी ठेवण, बिना फ्रेमचा चष्मा. अश्या सोबर पेहरावात प्रणाली मला भेटायला आली होती.

वागण्या बोलण्यात सुध्दा कमालीचा साधेपणा होता. 'मॅक डी' च्या मेनू मधल्या अर्ध्या गोष्टी तिने ऐकल्या सुद्धा नसाव्यात. अशीच काकुबाई मुलगी सून म्हणून घरी आणावी हेच मनात पक्क झालं होतं. पहिल्याच भेटीत तिने माझ्यावर चांगली छाप पाडली होती.

आता फक्त विचार जुळले की झालं. अजून एक दोनदा भेटून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील ह्या मतावर आम्ही दोघेही सहमत झालो.

मॉल मधल्या भेटीनंतर रोज मेसेज आणि फोन कॉल्स होऊ लागले. फोनवरील तिचं बोलणं खूपच मधाळ असे. मी तर तिला माझ्या बायकोच्या भूमिकेत पाहू लागलो. आता फक्त तिने मला 'अहो' अशी हाक मारणं बाकी होतं.

पहिल्या भेटीनंतर दोन-तीन आठवडे होत आले होते, मेसेज आणि फोनवरून बोलून आता नात्यात बरीच मोकळीक आली होती. तरीही तिच्या मनाचा थांगपत्ता काही लागत नव्हता. शनिवारी पुन्हा भेटायचं ठरलं. 

"श्रीकांत, मी पुढच्या महिन्यात आठवडाभर गोव्याला जाणार आहे माझ्या स्कुल फ्रेंडच्या लग्नासाठी." बर्गर खाता खाता प्रणाली मला बोलली.

प्रणालीच्या रुढीप्रिय विचारांनी आणि वागण्या बोलण्याने मी खूपच भाळून गेलो होतो. आईला अशीच सून हवी होती. ह्या भेटीनंतर प्रणालीला होकार द्यावा ह्या निर्णयावर मी आलो होतो. पण प्रणालीला अजून विचार करायला वेळ हवा होता.

प्रणालीला पटवणे आता महत्वाचं झालं होतं. आणि मी ते मनावर पण घेतलं होतं. लवकरात लवकर तिला सकारात्मक निर्णय घ्यायला भाग पाडणं गरजेचं होतं. आणि मला ते सहज जमेल असा मला अतिआत्मविश्वास होता.

मागच्या भेटीनंतर अजून तीन आठवडे निघून गेले असतील, पण प्रणाली निर्णयही कळवत नव्हती आणी पुढील भेटीसाठी पण बोलत नव्हती. शेवटी मीच तिला फोनवर शनिवारी भेटण्याबद्दल विचारलं.

"पण मला येत्या शनिवारी गोव्याला जायचं आहे ना? नंतर कधीतरी भेटुयात आपण. आणि जर तुम्हाला नसेल रहावत तर चला गोव्याला तुम्ही पण." हसत हसत प्रणाली बोलून गेली.

मस्करीत प्रणाली बोलून गेली पण माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. काय वाईट आहे गोव्याला जाण्यात? आठवडाभर मुंबईच्या धावपळीपासून सुटका आणि प्रणालीला पण वेळ देता येईल. ह्या युक्तीवर खूश होऊन मी स्वतःचीच पाठ थोपटत शुक्रवारी रात्रीची विमानाची दोन तिकिटं बुक केली आणि प्रणालीला मेल केला.

'मॅडम मेल चेक करा' मी मोठ्या तोऱ्यात प्रणालीला  मेसेज केला.

"श्रीकांत, काय आहे हे? तुम्ही खरंच येताय?" पंधरा मिनिटानंतर प्रणालीने फोन करून आश्चर्य व्यक्त केलं.

मग फोनवर मी तिला सविस्तरपणे गोव्याच्या प्लॅन बद्दल सांगितलं की कसं आपण विमानाने जाऊ मग मी हॉटेल मध्ये राहीन आणि रोज तुला भेटेन आपण खूप वेळ एकत्र घालवू वैगेरे.

आठवडाभर मी खूपच उत्साहित होतो. गोव्याला प्रथमच जात असल्याने खूप खरेदी पण केली. आणि प्रणालीला पण तर पटवायच होतं. अखेर शुक्रवारचा दिवस उजाडला आणि आम्ही विमानतळावर भेटलो.

विमानतळावर प्रणालीला बघताच माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. गडद मरून रंगाचा वन पीस तिने घातला होता. ड्रेस गुडघ्याच्या वर वीतभर तरी असेल आणि तिच्या मापापेक्षा एक माप लहानच. केसांची पण स्टाइल ड्रेसला साजेशी अशीच केली होती.

"तोंड तरी बंद कर श्रीकांत". मुलीला कधी पाहिलं नाहीस का? किती वेळ आहे अजून विमान उडायला?" मी तिला आ वासून बघत असताना तिने मला प्रश्न विचारला.

मी खूपच गडबडून गेलो होतो. काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. अगदी विमानात बसलो तरी मी ह्या धक्क्यातून बाहेर आलो नव्हतो.

"काय झालंय तुला? नॉर्मल हो ना आता. टेक चिल् पिल बडी. धमाल मजा करायची आता गोव्यात" प्रणाली मला 'अहो' तर सोडाच पण अरे तुरे करायला लागली होती.

विमान प्रवासात कळलं की प्रणाली माझ्याच हॉटेलवर राहणार होती. शनिवारी मॉल मध्ये भेटणारी प्रणाली हीच का असा प्रश्न पडावा इतकं विसंगत वागणं आणि पेहराव होता प्रणालीचा आज.

आम्ही गोव्याला उतरलो आणि टॅक्सीने हॉटेलवर आलो. मी चेक-इन करून रूमवर पोहोचलो तर मागून प्रणाली पण आली.

"आता काय झालं." मी तिच्याकडे वळून विचारलं.

"अरे वेगळ्या रूम वर कशाला पैसे वाया घालवायचे? आणि किती महागडं आहे हे हॉटेल? मी इथेच राहीन. पाच दिवसांचा तर प्रश्न आहे." प्रणालीचा आत्मविश्वास पाहण्यासारखा होता.

"तसंही मी कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट आहे. तुझ्या माहितीसाठी सांगतेय. बाकी काही नाही." प्रणाली बालिशपणे हसत बोलली.

ऑफिसच्या कामाने आणि त्यानंतर प्रवासाने मी थकून गेलो होतो. न जेवताच मला झोप लागली होती. पण रात्री भूक लागल्यामुळे मला जाग आली. रूम मध्ये मी एकटाच होतो, प्रणाली कुठे दिसत नव्हती. बाथरूम, बाल्कनी सगळी कडे शोधा शोध केली पण ती कुठेच नव्हती.

मोबाइलवर फोन केला, रिंग होत होती, पण ती फोन उचलत नव्हती. मध्यरात्रीचे दोन वाजून गेले होते. मी चिप्स खात टीव्ही बघत बसलो इतक्यात दरवाजा वाजला. आणि प्रणाली अक्षरशः झोकांड्या खात आत आली.

तिच्याशी ह्या क्षणी बोलण्यात काहीच अर्थ नव्हता.
माझ्या बेडवर जाऊन ती धपकन पडली आणि दुसऱ्या क्षणालाच गाढ झोपली सुद्धा. मग मी चरफडत सोफ्यावर झोपलो.

"गुड मॉर्निंग श्रीकांत."  मी बाल्कनीत योगा करत असताना प्रणाली मागून आली.

"प्रणाली कुठे गेली होतीस तू? आणि तू दारू प्यायली होतीस? कोणाबरोबर गेली होतीस आणि?" प्रणाली दिसताच मी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.

"अरे हो हो, किती प्रश्न विचारशील. रिलॅक्स हो जरा. मी काल रात्री पब मध्ये गेले होते आणि ड्रिंक्स ही घेतले. त्यात काय मोठं? तू कधी ड्रिंक्स घेत नाहीस?" प्रणालीला तिच्या वागण्याचा काहीही पश्चाताप वैगेरे वाटत नव्हता.

"हे बघ आता आपण गोव्यात आहोत. तू पहिल्यांदा आला आहेस का इथे? गोव्याचा एक नियम आहे. बाहेर निषिद्ध असणाऱ्या गोष्टी तू इथे करू शकतोस. तू जे काही गोव्यात करशील ते गोव्यातच राहील. तेव्हा इथे सर्व विसरून फक्त एन्जॉय कर." -प्रणाली

मला तर काहीच सुचत नव्हतं. नाश्ता करून मी बीचवर फिरायला गेलो. डोकं अगदी सुन्न झालं होतं, पण तासाभराच्या भटकंती नंतर समुद्राची मोकळी हवा, नारळाची झाडं आणि प्रसन्न असा निसर्ग बघून मला पण आता प्रसन्न वाटू लागलं.

प्रणालीला लग्नाबद्दल विचारावं असं मनाशी ठरवून मी रूमकडे वळलो. तिच्या ह्या एक दोन गोष्टी सोडल्या तर प्रणाली लग्नासाठी मुलगी चांगली होती. आणि तिचा होकार मिळाला तर गोवा टूर साठी झालेला खर्चही सार्थकी लागणार होता.

माझ्या चावीने दरवाजा उघडून आत आलो तर मुलीच्या कामुकपणे विव्हळण्याचा आवाज माझ्या कानावर पडला. पटकन आत येऊन पाहतो तर काय बेडवर प्रणाली आणि कोणीतरी गोरा माणूस नको त्या अवस्थेत मला दिसले.

मला बघताच तो गोरा माणूस घाबरून कपडे सावरत निघून गेला.

"तुला दरवाजा वाजवून आत यायचे पण मॅनर्स नाहीयेत का? मूर्ख!! सगळा मूड ऑफ केलास. मोठया मुश्किलीने त्या गोऱ्याला पटवलं होतं काल पब मध्ये". बेडवरच सिगारेट शिलगावत प्रणाली बोलली.

"माझ्याच रूम मध्ये मी दरवाजा वाजवून यायचं. प्रणाली खूप होतंय तुझं आता. तू मला फसवलं आहेस. किती आशेने मी तुझ्याकडे बघत होतो. साधी आणि सरळमार्गी मुलगी आहेस म्हणून मी लग्नाला तयार झालो होतो. तू तर खाली मुंडी पाताळ धुंडी निघालीस." आता माझं पण डोकं गरम झालं होतं.

"शट अप श्री, ऐकून घेतेय म्हणून काहीही आरोप करू नकोस. शांतपणे ऐकून घेणार असशील तर तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन." प्रणाली मग मला बीच वर घेऊन आली. आधी समुद्राकडे बघत शांतपणे बसलो आम्ही. प्रणालीच्या बोलण्याची मी वाट बघत होतो.

मग तिने सिगारेट काढून मला दिली. मी त्याला साफ नकार दिला.
"घे रे, अंकल बनू नकोस. खूप महाग आहे हे. सिगारेट नाही, ग्रास आहे. घे मस्त हलकं वाटेल."

आता तर मला चक्कर येणं बाकी होतं. दारू, पब, गोऱ्या मुलाबरोबर मुक्त प्रणय आणि आता गांजा. चिडून मग मी पण गांजा ओढायला घेतला.

"हे बघ श्री, मी तुला फसवून लग्न करू शकत होते. पण मला तसं करायचं नव्हतं. मी खूप संतुलित आयुष्य जगते. मुंबईत पाहिलंस तेही माझं खरं रूपच आहे. समाजाच्या दृष्टीने आदर्श वाटावं असं माझं जगणं-वागणं आहे. पण वर्षातून काही दिवस मी माझ्या मनाप्रमाणे स्वच्छंदी जगते. त्यासाठी मग बॅक पॅकिंग करून एकटीच फिरायला निघते. ज्या ज्या गोष्टी समाजाने निषिद्ध केल्या आहेत पण मला हव्या आहेत त्या गोष्टी मी अश्या ठिकाणी जाऊन करते. माझ्या कृतीतून कोणालाही दुःख पोहचत नाही आणि मीही खूश. मुंबईला गेले की पुन्हा तुला जुनी प्रणाली दिसेल."

प्रणालीच्या आयुष्य जगण्याच्या ह्या पद्धतीने मी अचंबित झालो होतो. खरंतरं मला आता तिच्याबद्दल आदरच वाटायला लागला होता. कोणालाही न दुखावता ती काही दिवसांसाठी का होईना पण स्वतःच्या मनाप्रमाणे आपल्या इच्छा आकांक्षाना मुरड न घालता जगत होती. आणि त्याच मुळे तिला मुंबईतलं साधं जीवन जगताना आपण खूप काही त्याग वैगेरे केलाय अशी सल बोचत नव्हती.

तिथेच बीच शॅक वर काहीतरी खाऊन आम्ही गप्पा मारत बसलो. बालिश वाटणाऱ्या प्रणालीने आयुष्यातला खूप मोठा धडा सोप्पा करून शिकवला होता. बायको नाही पण स्वभावाने माझ्यापेक्षा खुप वेगळी असून खूप चांगली मैत्रीण तिच्या रूपाने मला मिळाली होती.

आराम करावा म्हणून आम्ही दोघे हॉटेल कडे निघालो तर मागून आवाज आला.

"श्री, इज ईट यु?"

मागे वळून पाहतोय तर समोर मीरा दत्त म्हणून उभी होती.

तिने धावत येऊन मला हग केलं आणि गालावर किस करून हातात हात धरूनच उभी राहिली.

आता अजून काय नशिबात वाढून ठेवलंय ह्या विचाराने पुन्हा एकदा माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली..

क्रमशः

-शरद नारायण यादव


आकर्षण (भाग चार)

 

          इटलीच्या मुक्कामात दोन दिवस कोणतीही भीड भाड न ठेवता मीरा आणि मी एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत होतो.

पण जर्मनीला येताच क्षणी मला अपराधी वाटू लागलं. अप्रत्यक्षपणे यशचा विश्वासघातच केला होता मी. आणि त्याची टोचणी माझ्या मनाला लागत होती. मी यशशी नजरही मिळवू शकता नव्हतो.

पण मीराच्या वागण्या बोलण्यात काहीच फरक पडला नव्हता. मला तिचं वागणं खूपच विचित्र वाटत होतं. सर्वकाही सामान्य असल्यासारखंच मीरा माझ्याशी आणि यशशी वागत होती.

संपूर्ण आठवडा असाच गेला, सर्व गोष्टी पूर्वपदावर येत होत्या. शुक्रवारी आमची नेहमीची बैठकही व्यवस्थित पार पडली.

अकरा वाजता मी झोपायला म्हणून माझ्या रूमवर आलो आणि इतक्यात डोअरबेल वाजली. दरवाज्यात मीरा शाम्पेन आणि दोन ग्लास घेऊन उभी होती.

"श्री, तुझ्या रूमची डुप्लिकेट चावी मला दे. मला बेल वाजवायला वेळ नसतो." मला हाताने दूर ढकलत मीरा तडक आत आली.

"आता बघत उभा का राहिलायस, ये सेलिब्रेट करूयात प्रोजेक्टचं पन्नास टक्के माईलस्टोन अचिव केलंय आपण." मीरा ने ऑर्डर सोडली.

"हा थांब, यशला पण बोलावतो." मी फोन हातात घेत बोललो.

"नको, फक्त तू आणि मीचं. फोन ठेवून इकडे ये आता पटकन." -मीरा.

मीराचं वागणं मला विचित्र वाटत होतं, पण मलाही मोह आवरत नव्हता, मलाही तिच्याबरोबर एकांत हवा होता. मी तिला पूर्णपणे शरण जात ड्रिंक्सनंतर पुन्हा एकदा प्रणयात आकंठ बुडालो.

"मीरा आय लव्ह यु." प्रणयाचा आवेशात मी बोलून गेलो.

माझं बोलून होतंय इतक्यात मीरा ने पटकन माझ्या गालावर मारलं आणि बोलली.
"डोन्ट यु डेअर टू रुईन धिस फन. जसं चाललंय तसंच पुढेही चालू दे. प्रेमासाठी वैगेरे माझ्याकडे वेळ नाही." काम आटोपल्यावर मीरा काही न बोलता निघून गेली. मला मात्र मीराला नाराज केल्याबद्दल वाईट वाटलं.

खूपच घाई केली होती का मी? पण खरंच मला आता मीरा शिवाय काहीच सुचत नव्हतं. यशबद्दल विचार करणंही सोडून दिलं होतं मी. आता मीरा माझ्याबरोबर होती. तिच्या मर्जीनुसार वागणं भाग होतं. आज ना उद्या तिला सुद्धा प्रेम होणारच होतं.

असेच दिवस जात राहिले. पण यश किंवा मीरा ह्या दोघांच्याही वागण्यात काहीच फरक पडला नव्हता. यशला मीरा सोबतच्या ब्रेक अप ने काहीच वाटलं नव्हतं का?

शुक्रवारची पार्टी संपली की मीरा माझ्या रूमवर येत असे. तिच्याकडे माझ्या रूमची चावी असे. तिचा मूड असेल तो पर्यंत मग ती रहात असे. आज ना उद्या ती स्वतःहून प्रेमाबद्दल बोलेल ह्याची मला खात्री होती. प्रोजेक्टपण आता पूर्ण व्हायला आला होता. दोनेक महिन्याचं काम बाकी होतं.

मीरा प्रेमाबद्दल काहीच बोलत नव्हती. तीच्या विचाराने मन अशांत होत होतं. कोणाशी तरी बोलून मन मोकळं करायचं होतं. यशला मीरा बद्दल आणि त्याच्या ब्रेक अप बद्दल विचारावं म्हणून त्याच्या रूमवर गेलो.

यशने दरवाजा उघडला, मी आत येऊन पाहिलं तर बेडवर मीरा शांत झोपली होती. तिला त्यावेळी तिथे पाहून माझ्यातर पायाखालची जमीनच सरकली. आल्या पावली रागारागाने मी माझ्या रूम वर परत गेलो. यश हाक मारत होता पण मी वळून पाहिलं देखील नाही. डोकं अगदी गरगरत होतं. काहीच सुचत नव्हतं.

कशातच मन लागत नव्हतं माझं, दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो नाही म्हणून यश संध्याकाळी रूम वर आला.

"अरे ऑफिसला आला नाहीस श्री. तब्येत तर ठीक आहे ना तुझी?" - यश

"तुझं ब्रेक अप झालं होतं ना मीरा बरोबर?" त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून मी त्यालाच विचारलं.

"काय बोलतोयस तू? मीरा बरोबर माझं ब्रेक अप का होईल?" यशच्या उत्तराने मी पूर्णपणे गोंधळून गेलो.  काहीतरी गोंधळ आहे आणि मला मीरा कडूनच उत्तर मिळू शकणार होतं. मी यशला तिथेच सोडून तडक मीराच्या रूम वर गेलो.

"मीरा, काय चाललंय हे? तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही?" मी संतापून मीराला विचारलं.

"शांत हो आधी. माझं तुझ्यावर प्रेम नाहीये मागेच सांगितलं आहे तुला. नाऊ गेट आउट" मीरा ने काहीच न ऐकता मला दरवाज्यातूनच हाकललं. मी चरफडत पुन्हा माझ्या रूमवर आलो यश तिथे नव्हता.

दुसऱ्या दिवशी पुन्हा मी ऑफिसला गेलो नाही. शुक्रवारचा दिवस होता. मी यशच्या रूम वर गेलो.

"अरे आलास तू? मला वाटलं आजचा बेत कॅन्सल. काय झालंय असा वैफल्यग्रस्त का दिसतोयस?" - यश

"मीरा तुझ्या रूमवर का आली होती परवा?"-मी

"नेहमीच तर येते त्यात काय विशेष? आणि कोण बोलला तुला आमच्या ब्रेकअप बद्दल?" यश ला नक्कीच माहीत नव्हतं म्हणजे त्याचबरोबर काय चाललंय ते.

मग मी यशला माझ्या आणि मीरा बद्दल सर्व काही सविस्तर सांगितलं. माझं कसं तिच्यावर प्रेम आहे ते पण सांगितलं. मी फसवलो गेलो होतो. आणि भावनाविवश होऊन आता मी रडत होतो.

यशने माझी समजूत काढली. माझ्या एवढाच तो ही नाराज झाला होता. त्याचीही फसवणूक झाली होती हे नक्की. आपण तिला जाब विचारावा, ते ही दोघांनी एकत्र असं आमचं ठरलं आणि आम्ही दोघे तिच्या रूमवर गेलो.

"दोघे एकत्र? अरे वा आज माझ्या रूम वर बसायचं  आहे का?"- मीरा

"मीरा आम्ही गंभीर विषयावर बोलण्यासाठी आलोय तुझ्याकडे." मी जराश्या रागातच बोललो.

"तू आमच्या दोघांचा ही विश्वासघात केला आहेस. फसवणूक झालीय माझी. इतकं प्रेम केलं मी तुझ्यावर आणि तू हे असं केलंस माझ्याशी. आणि ते ही माझ्या बेस्ट फ्रेंड बरोबर." यश ने एका दमात सर्व सांगितलं.

मीरा गप्प होती, हीच संधी साधून मग मी पण तोंडसुख घेतलं आणि कसा माझ्यावर अन्याय झालाय आणि कसा माझ्या प्रेमाचा तिने अपमान केलाय ते सांगितलं.

"बसा. इडिअट्स बसा. आता सांगा कोणाच्या भावना दुखावल्यात आणि का? यश मी तुला कधी कमीट केलं होतं? आणि श्री तू रे. तुला तर कानाखाली देऊन मी समजावलं होतं, इतक्यात विसरलास?" मीराने आम्हाला दोघांनाही विचार करायला भाग पाडलं.

"दोघांनाही चांगलंच माहीत आहे मला प्रेम वैगेरे साठी वेळ नाहीये. मला कोणतीही कमिटमेंट नकोय. घरी सांगतील त्याच्याशी मी लग्न करणार हे तुम्हाला माहीत होतं ना? तुमच्या मनाविरुद्ध माझ्याशी नातं ठेवा ह्यासाठी मी तुम्हा दोघांनाही कधीच सांगितलं नाही. आणि मी कोणाशी नातं ठेवायचं आणि कोणाशी नाही हे माझं की ठरवते. मला जे हवं होतं तेच तुम्हा दोघांनाही हवं होतं. त्या त्या वेळी आपल्याला ते ते एकमेकांकडून मिळालंय. मग आता हे भांडण कशासाठी? तेव्हा हा मंकी बिजनेस आता बंद करा." मीरा ने आमची बोलती बंद केली.

मी तर खरंच वैफल्यग्रस्त झालो होतो आता. यशने स्वतःला कसंबसं सावरलं होतं. कामात तर माझं लक्षच नव्हतं. कामाव्यतिरिक मिराशी बोलणं आम्ही टाळत होतो. त्यानंतर दोन तीन आठवड्यातच प्रोजेक्ट संपला आणि आम्ही परत भारतात आलो.

हळूहळू ऑफिसमध्ये पुन्हा रुळू लागलो होतो पण मीराला विसरणे खूपच अवघड जात होतं. मी मीरा शी बोलणं सुरू केलं होतं. अजूनही मला पुसटशी का होईना आशा होती की मीरा माझ्याकडे पुन्हा येईल. ह्या गोष्टीमुळे यश माझ्यावर हसत होता. तो आता मीरा प्रकरण मागे टाकून पुढे गेला होता.

दोन महिन्यानंतर एकदा आठवडा झाला तरी मीरा ऑफिसमध्ये दिसली सुद्धा नाही. आणि एका संध्याकाळी मेसेज आला.

"इडीअट, चेक युअर ई-मेल."

मी मेल चेक केला, मीराने लग्नपत्रिका पाठवली होती. मीराने तिचं म्हणणं खरं केलं होतं. माझी राहिली-साहिली आशा पण मावळली होती.

मीरा प्रकरणातून बाहेर यायला मला सहा महिने लागले असतील. पण आता मी पूर्णपणे मीराला
विसरलो होतो. ऑफिसचा नित्यक्रम आता सुरू होता, घरचे माझ्या लग्नासाठी मागे लागले होते.

मी पण सक्रियपणे आता वधु संशोधन सुरू केलं होतं आणि तेवढयात एकदा मीरा चा फोन आला.

"श्री, चल ना महाबळेश्वरला फिरायला जाऊया दोन तीन दिवस फक्त तू आणि मी. आता नाही म्हणू नकोस."

क्रमशः

-शरद नारायण यादव


आकर्षण (भाग तीन)

 

          दोन आठवडे लागले जर्मनीत सेटल व्हायला. कडाक्याची थंडी, लहान दिवस आणि मुंबई पेक्षा साडेचार तास मागे. रात्रीचं जेवण स्वतः करावं लागे, पण अजून डाळ भाताच्या पुढे काही गेलो नव्हतो. घरची खूपच आठवण येत होती. कट्टाही मिस करत होतो. गँग मधल्या फक्त रोहितशी बोलणं होत होतं आणि त्याच्याकडूनच बाकीच्यांची ख्याली खुशाली कळत होती.

ऑफिसपासून हॉटेल तासभर अंतरावर होतं. मुंबई ऑफिसचे पन्नासभर सहकारी तरी असतील. जाता येता रोज नवीन चेहरे भेटत होते. मन लावून काम करायचं आणि हेड ऑफिसमध्ये चांगली छाप पडायची एवढंच लक्ष होतं. पाच दिवस मान मोडेस्तोवर काम करायचो आणि शनिवारी रविवारी झोपून काढायचे असे दिवस चालले होते. बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवण्याची इच्छा होत नव्हती.

पण हळूहळू मी रुळू लागलो नवीन वातावरणात.
थंडीचा ऋतु पण संपत आला होता. हळूहळू ओळखी वाढल्या होत्या आणि नवीन नवीन जागा फिरण्याचे बेत आखले जात होते. बहुतेकदा ऑफिसमधले भारतीय सहकारी मिळून प्लॅन करून आणि फिरायला जात असू.

ते म्हणतात ना, मैत्री ही समविचारी किंवा समव्यसनी लोकांशी होते त्याप्रमाणे यश मेहरा आणि अनुज ह्यांच्याशी माझी घट्ट मैत्री झाली, दर शुक्रवारी ड्रिंक्सचा प्लॅन होत असे. यश मला एक वर्ष सिनिअर होता आणि सध्या खूप महत्वाच्या प्रोजेक्टवर काम करत होता.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माझ्या बॉसने मला बोलावून घेतलं.

"श्रीकांत, सर्व लोक तुझ्या कामावर खुश आहेत आणि आम्हाला तुझी इथे गरजही आहे. पण रिसर्च टीम मध्ये तू जावं असं वरच्या साहेब लोकांना वाटतंय. तिथे ह्यापेक्षा जबाबदारीच काम आहे आणि शिकायलाही खूप मिळेल. तूला तिथे जायचं असेल तर सोमवार पर्यंत मला कळव."

मी विचार करून कळवतो असं सांगून बाहेर आलो, पण आतून खूप खुष होतो. मला सुरवातीपासून रिसर्च टीम मधेच जायचं होतं. ह्या शुक्रवारी जंगी पार्टी होणार होती. यशची टीम जॉईन करणार होतो मी आता ऑफिस मध्ये सुदधा.

दोन आठवड्यांनंतर रिसर्च बिल्डिंग मध्ये गेलो. यशने सर्वांची ओळख करून दिली आणि आपला भारतीय बॉस उशिरा येईल असं बोलून त्याचा जागेवर गेला.

मी नवीन जाग्यावर लॉगिन करून बसलोच होतो इतक्यात मागून आवाज आला.

"हाय!! तूच श्रीकांत का?"

"हो मीच. तुम्ही??" -मी

"मी मीरा रेड्डी, ह्या प्रोजेक्टची लीड. हे बघ, मी सरळ मुद्याचं बोलते, खरं म्हणजे आम्हाला अनुभवी टीम मेंबर हवा होता. पण मॅनेजमेंटने तुझं नाव पुढे केलंय. तुला हे जमेल असं मला वाटत नाही तेव्हा तू पुढच्या आठवड्यात 'मला नाही जमणार' असं सांगून निघून जा म्हणजे मला नवीन रिसोर्स मिळेल."  सरळसरळ माझा पाणउतारा करून मीरा रेड्डी आली तशी निघून गेली. मी रागाने आणि अपमानाने थरथरत तिथेच उभा होतो.

माझा स्वाभिमान डिवचून मीरा निघून गेली. माझा आत्मविश्वास तिने हलवला होता. लंचब्रेक मध्ये मी यशला सविस्तर सांगितलं सकाळच्या घटनेबद्दल.

"हम्म! अंशतः तिचं खरं आहे श्री. आम्हाला खूप कमी वेळात हा प्रोजेक्ट द्यायचा आहे, खूप प्रेशर आहे मीरा वर. पण मला खात्री आहे तू यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडशील. घे चॅलेंज, दाखवून दे मीराला तू काय आहेस ते. दुपारनंतर मी तुला सगळे डिटेल्स देतो तू समजून घे अन मग पुढच्या सोमवारी वीकली मीटिंग मध्ये सांग काय ते." यशने वस्तुस्थिती समजावली.

जेवणानंतर यशने मला थोडक्यात काम समजावलं.

"श्रीकांत, ही आहे तुझ्या कामाची यादी. सर्व फाईल्स एका जागी ठेवल्यात त्या तू स्टडी कर. आणि कामाला सुरुवात कर. फाइल मधली 'टास्क वन' तू करायला घे. ती टास्क मयांक एका आठवड्यात पूर्ण करत होता. तो जिनियस आहे पण त्याने राजीनामा दिलाय. तुला त्या टास्क साठी दोन आठवडे लागतील असं मीरा ने गृहीत धरलंय. आणि त्याप्रमाणे कामाचं नियोजन करून बाकी टीम मेंबर ना जास्तीच काम दिलंय. त्यामुळे ते लोकही तुझ्या येण्याने विशेष खुश नाहीयेत." यशने मला काम समजावून दिलं.

मीही आता इरेला पेटलो होतो. माझ्या अहंकाराला मीराने दुखावलं होतं. संध्याकाळी यशसोबत घरी जाणं बंद केलं. जितकं जमेल तितकं ऑफिस मध्ये बसू लागलो त्या आठवड्यात सरळ चार दिवस रात्री मॅगी नूडल खाऊन काढल्या. रात्री बारा-एक पर्यंत बसून ऑफिसचं काम करू लागलो.

कामापेक्षा दुखावलेल्या अहंकाराने मी चेतावलो होतो. काही करून यशस्वीपणे काम पूर्ण करणार होतो.

"श्रीकांत, जमतंय का रे? ह्या आठवड्यात एकही दिवस आमच्यासोबत आला नाहीस. एवढा लोड घेऊ नकोस. नाही झालं तर सरळ नाही जमत बोलून निघून जा पुन्हा तुझ्या जुन्या ग्रुप मध्ये." शुक्रवारी ड्रिंक्स घेताना यश बोलला.

ड्रिंक्स घेता घेता मग यशने मीराची बरीच माहिती दिली.

मीरा रेड्डी, दिसायला सावळी पण सरळ नाक, पाणीदार डोळे आणि दाट काळेभोर कुरळे केस. एकदम आखीव रेखीव अशीच होती. आय आय टी मद्रास मधून एम टेक केलं होतं. प्रत्येक कामात शार्प आणि खूप मेहनती. फक्त तीन वर्षात ती प्रोजेक्ट लीड झाली होती. बाकी लोकांना त्या लेव्हलला यायला कमीतकमी दहा वर्षे लागतात. हा तिचा पहिलाच प्रोजेक्ट होता. त्यामुळे बिलकुल चान्स घेत नव्हती ती.

यश च्या बोलण्यातून कळलं होतं की तिने दाखवलेली घमंड अगदीच उगाच नव्हती. तिच्या क्षमतेमुळे तिला गर्व आला होता. पण मग मी पण खूप हट्टी होतो.  हे कामच नव्हे तर हा प्रोजेक्ट यशस्वी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नव्हतो.

लॅपटॉप वर शनिवारी आणि रविवारी सुद्धा काम करत होतो मी.

"गुड मॉर्निंग एव्हरी वन, साडेदहा वाजलेत मीटिंग सुरू करूयात. नवीन मेंबर कुठे दिसत नाहीये, म्हणजे तो प्रोजेक्ट सोडून पळून गेला असावा. म्हणजे अनुभवी मेंबरचा शोध लवकरच करावा लागेल." मीरा ने सोमवारी विकली मीटिंग ला सुरवात केली आणि मी आत प्रवेश केला.

मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मीटिंग मध्ये भाग घेतला आणि माझी वेळ आल्यावर माझ्या कामाचं सादरीकरण सुद्धा केलं. मी काम यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं. पूर्ण टीम मध्ये कुजबुज सुरू झाली, यश आनंदाने माझ्याकडे बघत होता बाकी दोघांनी अंगठा दाखवून अभिवादन केलं.

"श्रीकांत, तू हे काम करण्यात मयांकची मदत घेतली आहेस का? असं असेल तर आत्ताच कबूल कर पुढच्या आठवड्यात तो जाणार आहे त्यानंतर तुला जमणार आहे का?" पुन्हा एकदा मीरा ने माझ्यावर अविश्वास दाखवून माझा अहंकार डिवचला होता.

"व्हाय डु यु थिंक आय एम नॉट केपेबल टू डु दिस जॉब?" माझा सुटत जाणार संयम पुन्हा मिळवत मी बोललो. "मी मयांकला ओळखत देखील नाही. मी खूप खोलवर जाऊन ह्या प्रोजेक्ट चा अभ्यास केला आहे. पूर्ण दोन दिवस खर्च करून मी एक अतिरिक्त टूल बनवलं आहे ज्याचा वापर करून अल्गोरिदम साठी लागणार वेळ निम्म्याहून कमी झाला आहे. आणि त्याचाच वापर करून मयांक जी टास्क एक आठवड्यात करत होता ती टास्क आपली टीम आता चार दिवसात करू शकते म्हणजे वीस टक्के कमी वेळेत."

मग मी अर्धा तास नवीन टूलचं सादरीकरण केलं. प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट डायरेक्टर आणि संपूर्ण टीमने माझ्या मेहनतीच आणि हुशारीचं खूप कौतुक केलं. मी मीराची बोलती बंद केली होती. माझे पाय जमिनीवर टेकत नव्हते.

"अभिनंदन!! माझ्या टीममध्ये तुझं स्वागत आहे" मीटिंग नंतर मीरा माझ्या डेस्कवर येऊन बोलली.

"धन्यवाद, पण मला वाटतयं मी माझ्या जुन्या ग्रुपमध्येच जावं. आय एम मिसिंग माय कलिग्स." मी उगाच बोललो.

"मला खात्री आहे तू इथे नवीन मित्रं बनवशील." मीरा समजुतीच्या स्वरात बोलली.

"इथे सर्व बॉस आहेत, मित्रं कसे होतील ते?" मी टोमणा मारण्याच्या उद्देशाने बोललो.

"हम्म!! आज संध्याकाळी ऑफिस सुटलं की ड्रिंक्सला जायचं का?" मिश्किल हसत तिने मैत्रीचा हात पुढे केला.

आता जर्मनीत खूप मजा येऊ लागली होती, आवडीचं काम, खूप धम्माल आणि आवडीची माणसं. होय, यश हा माझा समव्यसनी मित्र असेल तर मीरा समविचारी मैत्रीण झाली होती. दोनेक वर्ष  मोठी असेल वयाने पण वैचारिक पातळीवर तर माझी कॉपीच होती. शुक्रवारच्या आमच्या बैठकीत समजलं होतं की यश आणि मीरा एकमेकांना डेट करतायेत.

वीकएंड आणि मोठ्या सुट्ट्यांमध्ये जर्मनी आणि आजूबाजूच्या देशातील आकर्षणे पाहणंही चालू होतं. सहसा आम्ही तिघेच जात असू, यश मी अन मीरा. कधी कधी मी 'कबाब मध्ये हड्डी' होतोय असंही वाटायचं, पण प्रत्येक ट्रिपला मला जावंच लागायचं. आताशा त्यांनाही माझी सवय झाली होती.

ऑफिकमध्ये बराच वेळ खर्च होऊ लागला होता आता. प्रोजेक्टच काम वेगात सुरू होतं. ऑफिस मधला पूर्ण वेळ मीरासोबत असे आणि लंच ब्रेक मध्ये आमच्यासोबत यश असायचा.

एकदा ऑफिस कामानिमित्त फ्रांसला जायचं होतं पण फक्त दोन लोक जाऊ शकणार होते म्हणून
मग प्रोजेक्ट डायरेक्टने मीरासोबत मला जायला सांगितलं. तीन दिवस कॉन्फरन्स असणार होती. आम्ही जायला निघालो, नाही म्हंटलं तरी यशला थोडा मत्सर वाटला होता. त्याच्या चेहऱ्यावर तसं दिसत होतं.

तीन दिवस आम्ही फ्रान्सला राहिलो, मीराचा प्रोफेसशनलीसम आणि एकूणच व्यक्तिमत्व ह्यावर मी भाळून गेलो. तिची विचार मांडण्याची पद्धत, विचारांची स्पष्टता वाखाणण्याजोगी होती. सर्वच बाबतीत तिचे विचार एकदम सुटसुटीत होते. नात्यात सुद्धा काही गुंतागुंत नव्हती करत ती.

"काय झालं श्रीकांत, फ्रान्स च्या कॉन्फरन्स नंतर मी पाहतेय, तुझं लक्ष नाहीये कामात नीट." मीरा माझ्या कामातला एका चुकीवर नाराज झाली होती.

"अगं असं काही नाहीये." मी सावरत बोललो पण खरंच माझं मन लागत नव्हतं कामात. मीरा मध्ये गुंतत चाललो होतो मी.

"ठीक आहे श्री, पूल अप युअर सॉक्स, तुझा परफॉर्मन्स खूप जरुरी आहे ह्या प्रोजेक्ट च्या सक्सेस साठी" मीरा समजुतीच्या स्वरात मला बोलली.

त्या नंतर कधी वेंडर कडे कधी क्लायंट कडे आम्ही दोघेच जाऊ लागलो. आता अश्या ट्रिपची सवय झाली होती. प्रत्येक ट्रिप मध्ये नवीन काहीतरी शिकत होतो. यशलाही आता अश्या ट्रिपबद्दल असुरक्षित वाटत नसे. मीरा बद्दलचे विचार मी झटकून टाकले होते आणि प्रोजेक्टसाठी जीव तोडून काम करत होतो.

सन २०१० च्या नोव्हेंबर महिन्यात मिटिंगस साठी इटलीच्या एक शहरात जावं लागलं. थंडीचे दिवस होते. शहर खूपच सुंदर होतं. मीटिंग झाल्यानंतर आम्ही थोडं शहर फिरून आलो आणि जेवायला गेलो. बोलता बोलता एक दोन ड्रिंक्सही झाले. गप्पा खूपच रंगात आल्या होत्या म्हणून मग मीरा माझ्या रूम मध्ये आली होती. 

मी बेडवर झोपून बोलत होतो, मग तीही माझ्या बाजूला येऊन पडली आणि पुन्हा गप्पा सुरु झाल्या. गप्पा ओघात असताना नकळत माझ्या पायाचा स्पर्श तिच्या पायाला झाला पण तिने पाय मागे नाही घेतला. मग अचानक ती माझ्या केसांत तिची नाजूक बोटे फिरवू लागली. मला माझ्या भावनांवर अंकुश ठेवणे कठीण होते. मी स्वतःहून पुढाकार घेऊन तिच्या ओठांवर हलकेच ओठ टेकवले. आणि त्या नंतर संपूर्ण रात्र 'वुमन ऑन टॉप' म्हणजे काय ते अनुभवलं.

क्रमशः

-शरद नारायण यादव


आकर्षण (भाग दोन)

 

          लोणावळ्याच्या पिकनिक नंतर अत्यंत अपराधीपणाची भावना मनात असल्याने मी सोनलला टाळू लागलो. मुंबईला परत येताना तर मी नजरही मिळवू शकलो नव्हतो तिच्यासोबत. तिच्या मेसेजना रिप्लाय देत नव्हतो, ती समोर दिसली तर रस्ता बदलून जात होतो. कट्ट्यावर जायचं तर जवळजवळ बंदच केलं होतं. अभ्यासाची कारणं देऊन गँगला टाळत होतो.

आला दिवस ढकलून, लवकरात लवकर ह्या गोष्टीतून बाहेर यायचा प्रयत्न करत होतो. पण कधी ना कधी संकटाला सामोरं जावं लागणारच होतं. त्या दिवशी चकल्या करायला म्हणून आई मराठे काकूंच्या घरी गेली होती आणि तीच संधी साधून सोनल घरी येऊन धडकली होती. इथून मी पळून जाऊ शकत नाही हे तिला बरोबर माहीत होतं.

"वॉट्स राँग विथ यु? का टाळतोयस मला. तुझं काम झालं म्हणून मला टाळतोयस? वापरलं की टाकून द्या अशीच मनोवृत्ती आहे का तुझी? की तुला माझी कलीग प्रिया आवडलीय? खूप बोलत होतास तिच्याशी, पाहिलंय मी." सोनल खूपच चिडली होती आणि असबंध बोलत होती.

"काय बोलतेयस तू सोनल? मला मान्य आहे चुकी झाली माझी. पण हे आरोप..." सोनलने मला बोलणं पुरं करू दिलं नाही.

"चुकी झाली? कुक्कुलं बाळ आहेस तू? आपण दोघांनी जे केलं ते स्वेच्छेने आणि दोघांच्याही सहमतीने केलंय. मला ह्यात काही चूक वाटत नाहीये." सोनल ने नेहमीप्रमाणे सडेतोड तिची बाजू मांडली.

"मला मान्य आहे की आपण स्वेच्छेने आणि सहमतीने केलंय सर्व. पण माझं चुकलंय हेच की.." मी शब्द शोधू लागलो.

"हेच की काय?" सोनल उतावीळपणे विचारू लागली.

"हेच की मी तुझ्याशी केलेला प्रणय हा भावनाहीन होता. इन फॅक्ट आता ही मला तुझ्या बद्दल मैत्री व्यतिरिक्त वेगळ्या भावना नाहीत." मीही सरळ मुद्द्याला हात घातला.

"मग माझ्या भावनांचं काय? मी तर तुझ्यावर प्रेम करायला लागलेय पिकनिक नंतर तर आधी पेक्षा जास्त." सोनलच्या आवाजातील ताठरता आता लोप पावली होती.

"म्हणूनच तर मला अपराधी वाटतंय. सॉरी सोनल. मी संयम ठेवायला हवा होता. पण माझं तुझ्यावर प्रेम वैगेरे नाहीये." मी विनयशीलतेने पण कणखरपणे तिचं प्रेम नाकारलं.

"मी इतक्या सहजासहजी विसरू शकत नाही हे. जर मला जड जाणार असेल तर तुला अतिजड जाणार हे प्रकरण. लक्षात ठेव." धमकीवजा इशारा देऊन सोनल निघून गेली.

महिनाभरात सर्व पूर्वपदावर येईल असं गृहीत धरून मी वावरू लागलो. पण सोनल मानगुटीवर बसणार होती हे हळूहळू स्पष्ट होत होतं.

"श्रीकांत, तू तर खिलाडी निघालास. आम्हाला वाटलं त्यापेक्षा खूपच फास्ट आहेस तू तर" सागरने रात्री जेवणानंतर कट्ट्यावर बोलावून घेतलं होतं बोलायला.

"म्हणजे? नाही कळलं मला" मी सावध पवित्रा घेतला आणि अधिक माहिती विचारली.

"हे बघ वेड पांघरूण पेडगावला जाऊ नकोस, नेहाने मला सर्व सांगितलं आहे. सोनलने तिला लोणावळा पिकनिक बद्दल इत्यंभूत माहिती दिलीय." सागर माझ्यावर डोळे रोखत बोलला.

खुपच अवघडलो मी, स्वतःच्या बदनामीची चिंता न करता सोनल असं कसं सांगू शकते कोणाला? ते ही तपशीलवार..

"हे बघ सागर, लोणावळ्याला जे काही झालं ते आम्हा दोघांच्या सहमतीने झालंय. आता सोनल 'बळी' पडल्याचा आव आणू शकत नाही. सोनलने नेहाला हे सगळं सांगण्यामागचा उद्देश मला माहित नाही. पण आपण ह्यावर जास्त चर्चा न केलेली बरी. ती तीन बहिणींमध्ये सर्वात मोठी आहे. ही गोष्ट बाहेर पडली तर बदनामी होऊ शकते." मी

"श्री, सोनल चांगली मुलगी आहे. लहानपणा पासून मी तिला ओळखतो. तिचं तुझ्यावर प्रेम आहे. तुला काय हरकत आहे मग?" -सागर

"कशाबद्दल हरकत? काय बोलतेयस तू?" मी न समजून प्रश्न विचारला.

"तुला प्रेम करायला काय हरकत आहे? असंही नात्यात तुम्ही खूप पुढे गेला आहात." -सागर

"मूर्ख आहेस तू. असं तू किंवा तिने सांगितल्यावर प्रेम होतं का? आणि सध्या तरी मला सोनल बद्दल असं प्रेम वैगेरे काही नाहीये. माझ्या लक्षात येतंय तू मला भेटायला का बोलावलं आहेस ते. माझा निरोप तू पोहचव आणि पुन्हा मला समजावण्याचा भानगडीत पडू नकोस." आता मला कळून चुकलं होतं की सोनलने नेहाला पिकनिक बद्दल सगळं का सांगितलं ते. पण असा दबाव आणून मला तिच्यावर प्रेम होणार होतं का?

त्या नंतर सोनलने हर एक प्रकाराने मला प्रेमात पाडण्याचा प्रयत्न केला. कित्येकदा नेहाने सोनल किती 'बिचारी' आहे आणि तिच्यावर कसा अन्याय होतोय असं मला पटवून द्यायचा प्रयत्न केला.

गिफ्ट, फुलं, ग्रीटिंगस खूप काही करून झालं. बलिशपणाची हद्द तर तिने रोहितशी फ्लर्ट करून केला, मला मत्सर वाटून मी तिच्याकडे पुन्हा जाईन असं तिला वाटत होतं. पण तिच्या प्रत्येक कृतीने माझा निर्णय योग्य आहे हेच मला पटवून दिलं.

"सोनल, बस कर आता. वर्ष होत आलं पिकनिकला. त्यानंतर आपलं धड बोलणं ही नाही झालं. माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेमभावना नाही उत्पन्न होऊ शकत. मला अजून करिअर करायचं आहे, खूप काही प्लॅन्स आहेत माझे. मला ह्या सर्व गोष्टींत नको अडकवूस. प्लिज" सोनलला एकदा कट्ट्यावर बसून समजण्याचा प्रयत्न केला मी.

"श्री तू जितकं मला दूर करतोयस तितकीच मला तुझी आस वाढतेय. मला एक संधी दे. तुला नक्की प्रेम होईल." सोनल विनवणी करत होती.

"संधी दे?? म्हणजे काय करू? प्रेमभावना अशी जागृत नाही होऊ शकत" - मी

"पुढच्या शनिवारी मी घरी एकटीच असणार आहे, तू प्लिज ये. लोणावळा पुन्हा सेलिब्रेट करू आपण.  माझ्या प्रेमाच्या वर्षावात न्हाऊन निघशील तू." -सोनल

"ते शक्य नाहीये. मला तुझ्या बद्दल त्या भावना नाहीयेत. तुला खोटी आस ही दाखवायची नाहीये मला आणि लोणावळा पिकनिक पण तू लवकरात लवकर विसरून जा." - मी

"श्री प्लिज, बरं राहू दे ते प्रेम वैगेरे, पण कमीतकमी  पुन्हा मला तुला अनुभवायचं आहे. आयुष्यात पुन्हा तुला त्रास नाही देणार. पण एकदा तो अनुभव मला पुन्हा हवाय. प्लिज प्लिज.." -सोनल

"शी!! सोनल, काय ही भाषा. तुझं तुझ्या डोक्यावर नियंत्रण नाही राहिलं आहे. आपण न बोललेलंच बरं" इतकं बोलून मी तडकाफडकी तिथून निघून आलो.

त्यानंतर सोनलने माझा पिच्छा सोडला. आता आयुष्य पूर्ववत झालं होतं. कट्ट्यावर पण नियमितपणे जाऊ लागलो होतो. फरक इतकाच होता की सोनालशी मैत्री आता पूर्वी सारखी राहिली नव्हती.

पटापट दिवस जात होते, मलाही आता जॉब मिळून  तीनेक महिने झाले होते. डिसेंबर चा महिना होता आणि न्यू इयर पार्टीचा प्लॅन सुरू झाला.

सागरच्या काकांचा कर्जतला फार्म हाऊस आहे. तिथे न्यू इअर सेलिब्रेट करायचं ठरलं. कामाच्या व्यापामुळे पार्टीच्या नियोजनात माझा सहभाग शून्य होता. एकतीस तारखेला माझ्या गाडीतून अजून तिघे येणार एवढंच मला माहित होतं.

खूप काम केल्याने आता पार्टीत खूप धमाल करायची असं ठरवून कर्जतला पोहचलो. आठ साडे आठ वाजता बंगल्यावर पोहचलो खूप उत्साहित होतो, पण तिथे जाताच पूर्ण उत्साहावर पाणी फिरलं.

मुलींच्या घोळक्यात मधोमध सोनल बसली होती, पण आश्चर्य म्हणजे तिने माझ्याकडे दुर्लक्ष केलं मी स्वतःहून हाय हॅलो करूनही.

पार्टीला सुरवात झाली सोनल नेहमीपेक्षा जास्तच सुंदर दिसत होती.

"श्री, आता तू स्वतःहून सोनल कडे गेलास तरी ती तुला भाव देणार नाही." मी चोरून सोनलकडे पाहताना सागरने मला रंगेहात पकडलं होतं.

"हाहा!! मला सोनल बद्दल अजूनही काहीच फिलिंग्स नाहीत. फक्त वाईट एकाच गोष्टीच वाटतंय की आम्ही चांगले मित्रं होतो. वैचारिक पातळीवर आम्ही अनुरूप होतो. पण तिच्या त्या हट्टामुळे आमची मैत्री पण तुटली." अगदी सविस्तर मी सागरला सांगितलं

"झालं गेलं विसरून पुन्हा मैत्रीचा हात पुढे का करत नाहीस मग. नवीन वर्ष नवीन सुरवात. व्हॉट से?" सागरने ड्रिंक्स चा ग्लास पुढे करत प्रस्ताव ठेवला.

"हात पोळलेत मागच्या प्रकरणाने. आता काही सुरवात-शेवट नको." मी सरळसरळ विषयाला बगल दिली.

बरोबर बाराच्या ठोक्याला सगळ्यांना हॅपी न्यू इअर विश केलं. सगळे एकमेकांना हग करत होते नव्या वर्षाकडे उमेदीने बघत होते. मी पण बाल्कनीत येऊन रोषणाई बघत होतो. इतक्यात मागून ओळखीचा आवाज आला.

"हॅपी न्यू इअर." सोनल मला विश करायला डेक वर आली होती.

"हॅप्पी न्यू इअर सोनल." मी पण मोजकाच प्रतिसाद दिला.

"एवढा कडवटपणा का आलाय श्री? साधं न्यू इअर विश सुद्धा नाही केलंस?" सोनलने सौम्य हसत विचारलं.

"इतिहास तुला माहीत आहे सोनल, आणि शाहण्या माणसाने इतिहासतुन शिकावं" मी सुध्दा प्रत्युत्तर दिलं.

"हम्म" दीर्घ सुस्कारा सोडत सोनल बोलली "हो. खूपच आततायीपणा केला मी. तू मला दिलेला नकार मला सहन होत नव्हता. पण आता मी ते खूप मागे सोडून दिलंय. करियर वर फोकस केलंय तुझ्यासारखच."

"गुड!! हॅप्पी फॉर यु. मला पण ऑफिसमधून जर्मनीला पाठवताय पण मला नाही जायचंय."

मग आम्ही बाल्कनीत बसून आकाशात रोषणाई बघत बराच वेळ गप्पा मारत बसलो. खूप आठवणींना उजाळा दिला, पोट दुःखेपर्यंत हसलो, काही आठवणीनीं गहिवरून देखील आलं. छान थंडी पडली होती. रात्री खूप उशीर झाला होता. सगळीकडे सामसूम झाली होती एव्हाना.

"श्री तुला माहितेय किती दुखावलं आहेस तू मला?" भावनिक विषयावर बोलता बोलता सोनल पुन्हा माझ्याबद्दल बोलू लागली.

"मी काही जाणीवपूर्वक नाही केलं हे सर्व, मला कधीच तुझ्याशी असलेली मैत्री तोडायची नव्हती पण प्रेम करायला ही जमणार नव्हतं". मी स्पष्ट केलं.

पण सोनल मला आज खूपच भावनिक वाटत होती. मी तिच्यावर खरंच अन्याय तर नव्हता ना केलं, असंही वाटून गेलं.  बोलता बोलता सोनलने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि एका नाजूक क्षणी कधी आमचे ओठ एकमेकांत विलीन झाले हेच कळलं नाही. कोणाची तरी चाहूल लागली आणि सोनल भानावर आली आणि पटकन उठून निघून गेली.

दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही पुन्हा मुंबईला आलो पण सोनल कुठेच दिसली नाही, सकाळी लवकर निघून गेली होती ती.

"हम्म! श्री साहेब या. स्वागत आहे तुमचं कट्ट्यावर." सागरने दुसऱ्या दिवशी उपहासात्मकपणे माझं कट्ट्यावर स्वागत केलं.

"काय झालं रे? असा का बोलतेयस" मी सागरला प्रतिप्रश्न केला.

"जरा बाजूला चल मग बोलूयात" असं बोलून सागर मला हाताला धरून बाजूला घेऊन आला.

"प्रेम नाहीये ना तुझं सोनलवर मग पुन्हा तेच का केलंस? की प्रेम नकोच आहे तुला? तुला फक्त उपभोग घ्यायचा आहे ना? एकदा झालेली चुक असते. तू वारंवार सोनलचा फायदा घेतोयस आता. तिच्या भावनांचा अपमान करतोयस. तुला माझा मित्र म्हणवून घेण्याची लाज वाटते मला. उपभोगवादी!! सोनलने तुझ्यात काय पाहिलं देव जाणे." हे सर्व बोलून मला काही कळायच्या आधी सागर निघून गेला.

कट्ट्यावर पण सर्वांच्या नजरेत मला माझ्याबद्दल घृणाच दिसत होती. ह्यावेळी माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मला स्वतःचा खूपच राग येत होता. लाजिरवाणी गोष्ट केली होती मी. सोनलचे पण मेसेजेस यायला लागले होते, त्याचा जास्त त्रास व्हायला लागला होता. दिवसेंदिवस मी खूपच  अवघडलो जात होतो.

सोनलला आता मी कोणत्याही परिस्थितीत हवाच होतो. ह्या तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करणं मला जमत नव्हतं. म्हणून मग मी जर्मनीला जायचा निर्णय घेतला आणि ऑफिस मध्ये तसं कळवलं.

विमानात बसलो तेव्हा कुठे सुटकेचा श्वास घेतला. माझ्यासाठी सोनलचा अध्याय आता कायमचा संपला होता. सोनलचा नंबर डिलीट केला तो पुन्हा कधीही सेव्ह न करण्यासाठी...

-शरद नारायण यादव


आकर्षण (भाग एक)

 

           मेसेज आला म्हणून मोबाईलकडे लक्ष गेलं, पण रात्रीचे साडे बारा वाजले होते. एवढ्या रात्री कोण मेसेज करणार होतं? बायकोला सांगूनच मित्राबरोबर 'बसलो' होतो म्हणजे तिचा नक्कीच नसणार. शुक्रवारची रात्र सेलेब्रेट करायचा प्लॅन खूप दिवस सुरू होता. उत्सुकतेने घाई घाईत मोबाईल हातात घेतला तर नंबर होता जो मी सेव्ह नव्हता केला.
         
"श्री, खूप आठवण येतेय तुझी. मला मदत हवीय." असा होता मेसेज. व्हाट्सएप वरचा फोटो दिसत होता आणि ओळखीचा सुध्दा होता. सोनल मराठे, बँक कॉलोनीतील मैत्रीण. इमर्जन्सी असेल असं वाटल्याने लगेच फोन केला तर पलीकडून फोन कट केला.

"थँक्स तू मला ओळखलस, पण बोलू शकत नाही. मेसेजच पाठव." -सोनल

"काय झालं? कसली मदत हवीय?" - मी

"मानसिक मदत! तुझा सहवास हवाय" - सोनल

"सोनल, तुझंही लग्न झालंय आणि माझंही. मला ह्या सर्व गोष्टींत रस नाहीये. मागेही मी तुला बोललोय हे. मला पुन्हा कॉन्टॅक्ट करू नकोस." - मी

"मला हवा आहेस तू.. श्री. प्लिज..एकदा मला भेटायला ये आणि मला हवंय ते भरभरून दे प्लिज प्लिज" सोनल च्या मेसेज मध्ये आगतिकता दिसून येत होती.

"काय?? ठीक आहेस ना तू? गो टू हेल" मेसेज करून मी मोबाईल बाजूला फेकला. माझी बिअरची थोडीफार चढलेली नशाच उतरली.

अस्वस्थ झालेल्या मला पाहून दीपक ने विचारलं काय झालं, आणि झपझप वीस वर्षांपूर्वीचे दिवस डोळ्यासमोर आले.

दहावीच वर्ष संपलं तसं बाबांची बदली झाली म्हणून आम्ही मुंबईत आलो. बँक कॉलोनी छान होती पटकन छानसा ग्रुप तयार झाला. नवीन जागी मन रमू लागलं.

          सोनल मराठे, माझ्याच बिल्डिंगमध्ये तळ मजल्यावर राहत होती. सोनल तीन बहिणींमध्ये सर्वात मोठी,  एकदम डॅशिंग, नेहमीच मुलांच्या ग्रुप मध्ये रमणारी. गोरीपान, नाकी डोळी छान, दाट काळेभोर केस, कोणीही सहज भाळेल, असं व्यक्तिमत्त्व. पण तिचा स्वभाव एकदम रोखठोक त्यामुळे तिच्या वाटेला सहसा कोणी जात नसे. सर्व मुलं तिला दबकूनच असतं. दोन्ही लहान बहिणींच्या संरक्षणाची जबाबदारी तिने स्वखुशीने घेतली होती आणि नेटाने पारही पाडत होती. ग्रुप मध्ये मात्र मन मोकळं करून बोलत चालत असे.

सुरवातीला साफ मनाची वाटणारी सोनल आतून इतकी विक्षिप्त असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.

सन २००३ ची रंगपंचमी होती, दोन तीन वर्षांत चांगलीच मैत्री झाली होती बँक कॉलोनीतील गँगशी. आम्ही दुपारी दोन वाजेपर्यंत रंग खेळत होतो, खूप धमाल केली. भूक लागली म्हणून घरी जायला निघालो तर सोनल ने तिच्या घरी बोलावलं.

"श्री, घरी चल ना थोडावेळ बस मग जा" - सोनल

"अगं नको, भूक लागलीय मला" - मी

"ये ना रे घरी, मी तुझी भूक शमवेन" मला हाताने धरून आत खेचत सोनल मिश्किलपणे हसत बोलली. तिच्या अश्या आगाऊपणाचा मला रागच आला, पण नाइलाजाने मला आत जावं लागलं. तिच्या बहिणी अजून घरी आल्या नव्हत्या, आई बाबा पण नव्हते घरी.

"सोनल, कोणीच कसं नाहीये घरी? चल, संध्याकाळी येतो मी" अनामिक भीती माझ्या मनात तरळली.

"कोणी नाहीये तर अजूनच बरं आहे ना" सोनल दरवाजा बंद करत माझ्याजवळ येत बोलली.

"मला खूप भूक लागलीय आणि आई मला बोलावत असेल. मी निघतो" मी तिथून निसटण्याचा प्रयत्न करत होतो.

"थांब रे, इतक्या दिवसांनी संधी मिळालीय ही. अशी वाया जाऊ देणार नाही मी" आताशा सोनल माझ्या खूपच जवळ आली होती.

मी भिंतीला टेकलो होतो आणि ती इतक्या जवळ आली होती की तिचे जड श्वास मला जाणवत होते, आज तिला मी वेगळयाच रूपात बघत होतो.

"सकाळ पासून तुला रंग लावण्याची संधी शोधत होते आता तुही मला मनसोक्त रंग लाव, एकमेकांच्या रंगात भिजून जाऊयात आज" - एवढं बोलून तिने तिचे ओठ माझ्या ओठांवर ठेवून हलकासा चावा पण घेतला.

तिच्या अनपेक्षित अश्या वागण्याने मी गडबडलो आणि तिला बाजूला ढकलून घाईघाईने दरवाजा उघडून निघून गेलो. मला तर धक्काच बसला होता, सोनल कडून अशी अपेक्षा नव्हती. इतकी बेधडक आणि निर्धास्त चाल केली होती तिने, मी स्वप्नात सुद्दा असा विचार नव्हता केला. ग्रुप बाहेर तिचं माझं बोलणंही खास नव्हतं किंवा तिच्या मनात असं काही सुरू असेल याची पुसटशी शंकाही कधी आली नव्हती.

त्या दिवसानंतर मी सोनलला टाळू लागलो. ग्रुप मध्ये असतानाही मी तिच्याशी बोलत नव्हतो. तिच्या नजरेत साधी अपराधीपणाच्या भावनेची झाकही नव्हती. नक्कीच चारित्रहीन असणार ती असा मी अंदाज बांधून तिच्यापासून दूर राहू लागलो.

"श्री, एकदा ऐकून तरी घे माझं. मला बोलायचं आहे तुझ्याशी." जाता येता मला रस्त्यात अडवून मनधरणी करू लागली. पण माझ्या नजरेत ती पडली होती. अश्या मुलींपासून दूरच राहावं हेच शिकलो होतं लहानपणापासून.

मित्रांकडून नकळतपणे तिच्याबद्दल अजून माहिती काढू लागलो.

"श्री, तू आंधळा आहेस की बहिरा रे? की मूकबधिर आहेस?" सोनल बद्दल सागर ला विचारताच तो बोलला.

"म्हणजे?" मी न समजून त्याला विचारलं.

"अरे सोनलवर अर्धी कॉलनी मरतेय, पण तिच्या बेधडक अश्या वागण्याने सर्व तिला दबकून असतात. मागे 'इ' विंग मधल्या एकाने हिम्मत केली होती आणि तिला पत्र दिलं होतं, सोनल ने त्याला भर रस्त्यात कानाखाली वाजवली होती. अशी दुर्गा चंडिका स्वतःहून तुला भाव देते, मी तर म्हणतो लाइन मारतेय तुझ्यावर. आणि तू?? आंधळा झालंयस?" सागर ने सविस्तर माहिती दिली.

"सागर, ह्याला कदाचित मुलं आवडत असतील." रोहीतने डोळा मारून सागरला टाळी दिली आणि दोघे खो खो हसू लागले.

"असं नाही रे, सोनल छानच आहे. पण तिचं व्यक्तिमत्त्व असं आहे की मी त्या दृष्टीने कधी विचारच नाही केला". मी माझी बाजू स्पष्ट केली.

म्हणजे सोनलचा असा काही इतिहास नव्हता. तिला चारित्रहीन समजणं माझी चुकी होती. पण तिचं माझ्यावर प्रेम असलं तरी व्यक्त करण्याची ही कोणती पद्धत??

"श्री, आज तुला माझं ऐकावंच लागेल. प्लिज. का बोलत नाहीयेस ते तरी सांग." सोनलने कट्ट्यावर सगळ्यांसमोर मला विचारलं.

तिने सरळसरळ केलेल्या हल्ल्याने मीच खजील झालो. माझी काहीच चुकी नसताना मला अपराधी वाटू लागलं. बाजूला जाऊन बोलूया एवढंच मी बोलू शकलो तिथे गँग मध्ये. आता सागर आणि रोहितला काय सांगायचं हा देखील प्रश्न पडला होता.

"प्लिज समजून घे मला श्री. तुला नाही आवडलं, मी आता पुन्हा असं नाही वागणार. मला तू आवडतोस, व्यक्त करण्याची माझी पद्धत चुकली असेल. याची शिक्षा मला देऊ नकोस. पुन्हा आपण मित्र होऊयात?" तिच्या वारंवार अश्या विनवणीने मी पण माझा हेका सोडला आणि पुन्हा तिच्याशी बोलू लागलो.

मागचं सर्व विसरून पुन्हा आम्ही मित्र झालो, वर्ष सहा महिने निघून गेले असतील. माझी एक्साम संपली होती आणि तिचा नवीन जॉब सुरू झाला होता.

"श्री, माझ्या ऑफिसची पिकनिक आहे शनिवारी- रविवारी, लोणावळ्याला. तुला यावंच लागेल कारण तू आलास तरच मला घरून परवानगी मिळेल." सोनलला ऑफिस पिकनिकला जायचंच होतं.

"अगं पण मी काय करणार तुमच्या ग्रुप मध्ये, माझ्या ओळखीचं कोणीच नाही तिथे." मी प्रॅक्टिकल प्रश्न विचारला.

"मी आहे ना? अजून तुला कोण हवंय? आय प्रॉमिस मेमोरबल पिकनिक होईल ही." मी हो म्हणावं म्हणून सोनल प्रयत्न करत होती.

मलाही एक्सायटिंग वाटत होतं खरं म्हणजे ओव्हर नाइट पिकनिक वैगेरे, आणि आताशा आमची केमिस्ट्रीही छान जमू लागली होती. मग जास्त आढेवेढे न घेता मी तयार झालो.

पिकनिकचा दिवस उजाडला. औपचारिक ओळख झाल्यावर आम्ही सुमोत बसलो, थोडी दाटीवाटीच होती. दिवसभर भटकंतीला फार मजा आली. सगळे मिळून ९ जण होतो आम्ही आणि त्यात एक कपल.

रात्री बोनफायर वैगेरे छान कार्यक्रम होता, बिअर ची पण सोय होती. खूप एन्जॉय केला आम्ही, पण जशीजशी रात्र चढू लागली तसे लहान लहान ग्रुप होऊ लागले. सोनल माझ्याबरोबरच होती पण तिला तिच्या बाकी कलीग बरोबर वेळ मिळावा म्हणून मी झोपायला निघालो. तीन रूम्स होत्या त्या बंगल्यात, एका रुम मध्ये जाऊन मी झोपलो.

पूर्ण ग्रुप मध्ये सोनलच फार सुंदर आणि आकर्षक दिसत होती. आज पण ती किती मोहक वाटत होती गुलाबी कुर्ता आणि ब्लु जीन्स मध्ये. आज दिवसभर झालेल्या चोरट्या स्पर्शान्नी मन प्रफुल्लित झालं होतं. तिच्या वागण्यातही नेहमीपेक्षा बराच मोकळेपणा होता. बिअर, लोणावळा की सोनल चा सहवास माहीत नाही पण सोनल मला आज खूपच आकर्षित करत होती, तिचाच विचार करत होतो आणि इतक्यात दरवाज्याचा आवाज आला, मी झोपेचं सोंग घेतलं पण परफ्युमच्या सुवासाने मी ओळखलं की सोनल च आलीये.

सोनल येऊन माझ्या बाजूला बेड वर झोपली, तसं माझ्या छातीत जोरजोरात धडधडू लागलं. मनात असंख्य विचारांचं काहूर माजलं.
'का बरं ही आली असेल इथे , मुलींची तर वेगळी रुम असणार?'
'माझ्या साठीच आली असेल का?'
'ह्या वेळी तिने काही आगळीक केली तर ??'
'खरं म्हणजे मीच ही संधी सोडू नये' आता बिअर खरच धुमाकूळ घालू लागली माझ्या मनात. माझ्या पुरूषसुलभ भावना आकांत करू लागल्या. आज नक्कीच अघटित असं काही तरी होणार होतं.

आणि इतक्यात सोनलचा नाजूक हात माझ्या अंगावर आला, मी झोपेचं सोंग तसंच सुरू ठेवलं.

"श्री झोपलास का?" सोनल चा मादक आवाज.

"हम्म" मी

"बावळट आहेस काय? झोपायला आला आहेस इथे?"

माझा पुरुषी अहंकार दुखावताच मी पटकन वळून हल्लाबोल केला. जे घडू नये ते त्या रात्री घडलं. एकदा नाही अनेकदा. मर्यादेच्या सर्व सीमा ओलांडल्या आम्ही. प्रणयाने धुंद धुंद झालो होतो. कित्येकदा तृप्त होऊन पण पुन्हा अतृप्त होत होतो..

क्रमशः

-शरद नारायण यादव


आकर्षण (भाग सहा)

            "ओहोs श्रीकांत अंकल, हग्स आणि किसेस. कोण होती ती? गर्लफ्रेंड की काय?" प्रणाली मला चिडवत होती. मी शिताफीने विषय ...